पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२९ जून
अश्लील व्हिडिओ व्हायरल करून तुमची बदनामी करू, अशी धमकी देत बीडचे माजी आमदार भीमराव आनंदराव धोंडे यांच्याकडे तब्बल एक कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना जानेवारी ते 26 जून दरम्यान हॉटेल रॉयल येथे घडली. या प्रकरणी नगर मधील एका महिलेसह तिघांचा विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गायकवाड व बांगर ( पूर्ण नाव माहित नाही ) या दोन महिलांसह इस्माईल दर्यानी उर्फ भैया बॉक्सर ( रा. अहमदनगर ) अशा तीन जणांवर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भीमराव माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलेली आहे.
वरील आरोपींनी संगणमत करून फिर्यादीकडे तुमची अश्लील व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल करून तुमचे राजकीय कारकीर्द संपून टाकू, अशी धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. यातील 25 हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा