पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२ जुलै
गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस जामखेड पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे .
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आरोपी अमोल किसन आजबे असे आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना जामखेड पोलीस ठाणे येथे पोलीस शोध घेत असताना सदर आरोपी हा चिंचपुर गावचे शिवारात ता आष्टी येथे एका हॉटेल मध्ये येणार असलेबाबत माहिती मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि गौतमकुमार तायडे, पोहेकॉ अजय साठे, प्रविण इंगळे, पोलीस शिपाई प्रविण पालवे, दिपक बोराटे, ज्ञानेश्वर बेल्हेकर, सचिन पिरगळ, चालक पोहवा आडसुळ यांनी सदर हॉटेल जवळ सापळा रचून आरोपी अमोल किसन आजबे यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेऊन जेरबंद करण्यात यश मिळवले आहे .
आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आले असुन रिमांड कालावधीत आरोपी अमोल आजबे याचेकडुन गुन्हयातील हायवा ट्रक जप्त केला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा प्रविण इंगळे हे करत आहेत
नेमके काय आहे प्रकरण -
तहसीलदार गणेश माळी यांचे आदेशान्वये नायब तहसीलदार विजय इंगळे, मंडल अधिकारी नंदकुमार गव्हणे हे गौण खनिजाची अवैदय वाळु वाहतुकीची कारवाई करत असताना दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा सुमा. पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड गावचे शिवारात विशाल हॉटेलच्या जवळ पाटोदा ते जामखेड जाणारे रोडवर एक विना नंबरचा हायवा ट्रक वाळु (गौण खनीज) चोरी करुन घेवुन जाताना मिळुन आल्याने त्यास त्यांनी पकडुन नमुद हायवा ट्रक तहसिल कार्यालय जामखेड येथे घेवून येत असतांना आरोपी नामे १) अमोल किसन आजबे रा. जमादारवाडी ता. जामखेड 2) स्विफट कार वरील अज्ञात चालक यांनी सदरचा हायवा ट्रक आडवुन फिर्यादी नंदकुमार गव्हाण व साक्षीदार हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा आणुन फिर्यादी व साक्षीदार यांना मारहान, धक्काबुक्की करुन त्यांचे ताब्यातील हायवा मध्ये जबरीने घेवुन जावुन त्यांना भातोडी गावाचे शिवारात शिंदे वस्तीच्या पुढे नेवुन हायावातुन धक्का देवुन खाली उतरवुन देवुन फिर्यादी व साक्षीदार यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना करुन सदरचा हायवा त्यांचे ताब्यातुन गौण खनीजासह घेवुन पळुन गेले होते .
No comments:
Post a Comment