पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३ जुलै
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व अजित (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने मांडलेल्या पावसाळी अर्थसंकल्पात जनतेसाठी मंजूर केलेल्या कल्याणकारी योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जामखेड तालुका भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून युती सरकार भरघोस निधी आणि अर्थसाह्य देत आहे. त्यानुसार नुकत्याच जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सरकारने २१ ते ६५ वयोगटातील महिलांना शासनामार्फत दरमहा १५०० रुपये देण्यात येणार असून यासाठी ४६ हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात १७ जिल्हयात १० हजार महिलांना रिता खरेदीसाठी ८० कोटी तसेच मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजनेअंतर्गत वर्षातुन ३ गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. ५२ लाख ४१२ लाभार्थीयांना याचा लाभ होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य जीवन उन्नती अभियाना अंतर्गत ७ लाख नवीन गटांची स्थापना करून फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.
शेतीकरिता मुख्यमंत्री बळीराजा विज सवलत योजने अंतर्गत राज्यात ४४ लाख ६ हजार शेतकयांच्या ७.५.आश्र्वशक्ती क्षमतेच्या शेती पंपाना पुर्णतः मोफत विज पुरवली जाणार असून त्यासाठी १४ हजार ७६१ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
त्याच बरोबर शेतकरी, महिला ,भगिनी विद्यार्थी यांच्यासाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तरी या योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे गोपाळघरे यांनी प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून केले आहे
No comments:
Post a Comment