पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ऑगस्ट
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लोक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. साकत गावातून २४ ऑगस्ट रोजी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. सभापती पं. स. जामखेड भगवान मुरुमकर होते या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गावाचे सरपंच हनुमंत मुरुमकर होते तसेच प्रमुख अतिथी मा. ग्रा.पं सरपंच हरिभाऊ मुरुमकर, ग्रा.पं उपसरपंच राजाभाऊ वराट, ग्रा.पं सदस्य विठ्ठल वराट, ग्रा.पं सदस्य मिनल घोडेस्वार, आदर्श शिक्षक रोहित घोडेस्वार सर, पोलीस पाटील महादेव वराट, वृक्ष लागवडीस अग्रेसर रामभाऊ मुरुमकर, जि. प. शाळा समिती अध्यक्ष, पत्रकार बापुसाहेब घोडेस्वार उपस्थित होते.
आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला रथावर ठेऊन प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून गावातून DJ लाऊन वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली
या जयंती साठी विद्यार्थ्यांना वहि पेन तसेच महिलांना साड्या वाटप कार्यक्रम देखील ठेवला होता
अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष संपतलाल पूलवळे, बंडू पूलवळे, त्रिंबक पूलवळे, नामदेव पूलवळे, कृष्णा पूलवळे, मनोज पूलवळे, संदीप पूलवळे, आकाश पूलवळे, काशिनाथ पूलवळे व समस्त महिला, ग्रामस्थ उपस्थित होते आयोजक सुनील पूलवळे आभार अमोल पूलवळे यांनी मानले
No comments:
Post a Comment