पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/५ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढत असून मोटारसायकल, सोने चांदी व रोख रक्कम चोरी जाण्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर आता चोरांनी आपला मोर्चा पाळीव जणावरांच्या चोऱ्या करण्याकडे वळवला असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालून चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व सामान्य जनतेतून होताना दिसत आहे.
याबाबत सविस्तर असे की, खर्डा पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत हद्दीतील नागोबाची वाडी येथील शेतकरी बलभीम गोपाळघरे (वय७५) यांच्या घरासमोरील गोठ्यातून कोणीतरी अज्ञात चोरटय़ाने गावरान जातीचे शेळ्या व बोकडे असा ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल माल चोरून नेला. ही घटना दि. १ ऑगस्टच्या रात्री ९: ३० ते २ ऑगस्टच्या सकाळी ६:०० दरम्यान घडली असून फिर्यादी वयोवृद्ध शेतकरी बलभीम महीपती गोपाळघरे (वय७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ाच्या विरूद्ध गु.र.क्र. १३१/२०२४ भारतीय न्याय संहिता ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस हेडकॉन्टेबल शेंडे करत आहेत.
No comments:
Post a Comment