पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३० सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतची जीर्ण झालेली धोकादायक इमारत पाडावी यासाठी येथील युवकांनी जुन्या ग्रामपंचायत पुढे आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल पंचायत समिती जामखेड व खर्डा ग्रामपंचायत ने घेऊन उपोषणास बसलेल्या युवकांना दिनांक १४ डिसेंबर २०२४ या तारखेच्या नंतर ग्रामपंचायत इमारत पाढण्याबाबत कारवाई सुरू करणार असल्याचे लेखी आश्वासन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी गायकवाड साहेब, माने साहेब यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
त्यामुळे येथील आकाश पवार, गणेश सूळ, बबलू सुरवसे, योगेश सुरवसे, प्रशांत कांबळे ,गणेश नेहरकर, इत्यादींच्या लढ्याला अखेर यश आले. प्रत्यक्षात जुनी ग्रामपंचायतची इमारत पाडल्यास कमिटी चौक मोकळा श्वास घेणार असल्याचे चित्र अवघ्या काही दिवसात दिसणार आहे.
गेल्या प्रत्येक दिवसापासून ग्रामपंचायत मध्ये जुनी ग्रामपंचायत पाडण्याबाबत निवेदन देण्यात आले होते ठराव मंजूर झालेला होता याबाबत आकाश पवार यांच्या सहित येथील युवकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतला निवेदन दिले होते, व त्यामध्ये बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी खर्डा येथील युवक व ग्रामस्थांनी जुनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
उपोषण नंतर काही वेळातच विस्तार अधिकारी गायकवाड साहेब,माने साहेब, येऊन उपोषणकर्त्यांना दिनांक १४/१०/२०२४. जुनी ग्रामपंचायत पाडण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कडील आदेश दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाप्रमाणे व त्यात अटी व शर्ती प्रमाणे जुनी ग्रामपंचायत कमिटी इमारत पाडण्याबाबत कारवाई चालू होईल असे लेखी आश्वासन देण्यात आले.
यावेळी सरपंच संजविनी पाटील, ग्रामविकास अधिकारी बहिर भाऊसाहेब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे , मा. सरपंच संजय गोपाळघरे उपस्थित होते.
सदर लेखी आश्वासनाच्या प्रती माहितीस्तव मा.गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड,मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन खर्डा, मा. तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जामखेड यांना सादर करण्यात येणार आहेत.
यावेळी अरविंद गुजर, जमीर सय्यद, धनंजय सुरवसे, अनिकेत जायभाय,अनिल लोंढे, पृथ्वीराज चव्हाण, रमेश लोंढे, किशोर जावळे, सारंग जोरे, प्रसाद लोळगे,अक्षय सकट, महेश डोके, विकास डोके, सलमान आतार,ब्रम्हनाथ गोपाळघरे, किरण जाधव, विकास अरुणे, वैभव चव्हाण, बाळासाहेब गवळी अक्षय जायभाय अभिजीत चव्हाण, रवींद्र खोबरे,रवींद्र उदावंत, गणेश सुरवसे, सुरेश भोरे, अमोल कुरमुडे,अखिलेश शिंदे इत्यादी तरुणांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.
No comments:
Post a Comment