कुकडी’च्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वहिवाट मोजणी करण्याचे आदेश ,आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, ५ सप्टेंबर, २०२४

Home राजकीय बातम्या कुकडी’च्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वहिवाट मोजणी करण्याचे आदेश ,आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

कुकडी’च्या भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी वहिवाट मोजणी करण्याचे आदेश ,आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

गुरुवार, सप्टेंबर ०५, २०२४ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/५सप्टेंबर

कुकडीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी वहिवाट मोजणी करणे आवश्यक असून त्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. वहिवाट मोजणी प्राप्त होताच प्रांताधिकारी कार्यालयामार्फत उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. याबाबत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता.


कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी आणि त्यावरील शाखा कालव्यासाठी कर्जत तालुक्यातील ५४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात आले. परंतु गेल्या २०-२५ वर्षांपासून हे शेतकरी भुसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहेत. आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीमध्ये भुसंपादनाचा मोबदला मिळवून देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राशीन, जळकेवाडी, कोरेगाव, येसवडी, तळवडी, बारडगाव दगडी, धालवडी, चापडगाव, वडगाव, तनपुरा, पिंपळवाडी, होलेवाडी, आळसुंदे, बेनवडी, कोळवडी, करपडी, राक्षसवाडी बुद्रुक, करमणवाडी, डोंबाळवाडी,  माळंगी, कानगुडवाडी, राक्षसवाडी खुर्द, करपडी, रौकाळेवाडी, कुळधरण, वायसेवाडी, आंबीजळगाव, लोणी, मसदपूर या गावातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारकडून १७२ कोटी रुपये मोबदला मिळवून दिला आहे. 

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर या सरकारने भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबतच्या निकषात बदल केले आहेत. मूल्यांकनाच्या आधारे हा मोबदला देण्यात येणार असून याबाबतचे प्रस्ताव या वेळखाऊ तांत्रिक कारणांनी रखडले आहेत. ते वेगाने मंजूर व्हावेत आणि शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानुसार जलसंपदा विभागाच्या काही निवृत्त अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आलेली आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी अनेकदा शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोळवडी कार्यालयात बैठका घेतल्या आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी व कुकडी सिंचन मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला . या प्रश्नांवर विधीमंडाळतही वेळोवेळी आवाज उठवला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन कुकडीचे भूसंपादनाचे प्रस्ताव मंजूर करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याची मागणी केली होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांच्या पत्राला उत्तर दिले आहे. बऱ्याचशा गट क्रमांकामध्ये खातेफोड झालेली नसल्याने व आपआपसात संमती होत नसल्याने सहमती ऐवजी वहिवाट मोजणी केल्यानंतर खरेदीखतांची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. बहुतांश शेतकरी हे स्वखर्चाने वहिवाट मोजणीची मागणी करत असल्याने त्यानुसार वहिवाट मोजणी झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांना मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी तातडीने वहिवाट मोजणी पूर्ण करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांना देण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. त्यामुळे कर्जतमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना कुकडीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. 

……..

 कोट

‘‘महाविकास आघाडी सरकारकडून कुकडीच्या भूसंपादनाचा १७२ कोटी रुपये मोबदला मिळवून दिला. परंतु अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदल झाला आणि मोबदल्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यास उशीर होतोय. या कामाला गती देण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु असून त्याचाच भाग म्हणून तातडीने वहिवाट मोजणी करण्याच्या सूचना राज्य सरकाने दिल्या आहेत. जमिनीचे भुसंपादन झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे.


रोहित पवार
(आमदार कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at गुरुवार, सप्टेंबर ०५, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

मागासवर्गीय विकास निधीचा वापर न केल्याने घुमरी ग्रामपंचायत केली बरखास्त; ग्रामविकास मंत्रालयाचा आदेश

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

भिसीच्या पैशांवरून जामखेडमध्ये लोखंडी गज व काठीने दोघांना जबर मारहाण,सात जणांवर गुन्हा, दोन आरोपी अटकेत

आझाद क्रांती सेना अहिल्यानगर जिल्हाप्रमुख पदी पोपटरावजी फुले यांची निवड

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *