पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/४सप्टेंबर
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलिसांच्या बदल्याचे आदेश काढले असून जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे यांची बदली नुकतीच नेवासा पोलीस स्टेशन येथे झाली आहे.
त्या निमित्ताने जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
काल दि 03 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताचे सुमारास जामखेड पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा येथोचित सत्कार पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे जवळील पोलीस मित्र कर्मचाऱ्यांच्या वतीने अत्यंत जड अंतकरणाने निरोप समारंभ देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासमवेत महिला पोलिस निरीक्षक श्रीमती जाधव मॅडम व पोलीस कर्मचारी सर्व स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे हे जामखेड पोलीस स्टेशनला असताना त्यांचे कामकाज हे नेहमी चांगले राहिले आहे, दबंग, कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी,संवेदनशील आणि गरीब लोकांना नेहमी मदत करणारे असे त्यांची ओळख राहिली असून त्यांचे व्यक्तिमहत्व छान होते .त्यांनी अनेक गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे .तसेच सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन राहिलेले आहे.त्यांचे बदलीने जामखेड तसेच खर्डा परिसरातील नागरिकांनी दुःख व्यक्त केले आहे.
No comments:
Post a Comment