पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/६सप्टेंबर
आज दि.६ सप्टेंबर रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे कानोबा वस्ती येथे कॅम्प पार पडला असून राज्याचे महसूल मंत्री यांच्या आदेशाने राज्यात भटके विमुक्त व आदिवासी यांना स्थायिक गृह चौकशी वरून नागरिकत्वाचे पुरावे महसुलाच्या कॅम्पद्वारे काढून द्यावे असे पत्र काढल्याने जिल्ह्यातील महसूल ची यंत्रणा सक्रिय झालेली दिसली समाज कल्याणचे स. आयुक्त राधा किसन देवडे निवासी जिल्हाधिकारी पाटील व अँड. डॉ. अरुण जाधव यांच्या पुढाकारातून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज भ वि व आदिवासी समाजाचा नागरिकाच्या पुराव्यासाठी कॅम्प घेण्यात आला २४० आसपास समाज उपस्थित होता नाईक तहसीलदार इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सर्कल, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, ग्रामविकास केंद्र संस्थेचा स्टाफ यांच्या सहकार्याने कॅम्प घेण्यात आला ९०जॉब कार्ड २०० जात प्रमाणपत्र ४५ रेशन कार्ड १८० मतदान कार्ड हे प्रस्ताव पॅनल वरील सदस्यांनी तपासणी करून ऑनलाईन करण्यासाठी घेण्यात आले यावेळी ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापू ओहोळ सर यांनी कॅम्प घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली तहसीलदार इंगळे साहेब यांनी नागरिकत्वाच्या पुराव्यापासून कोणीही वंचित राहणार नसल्याचे सांगितले तसेच हा समाज खूप विकासापासून मागास आहे शासनाला दिसून आले इथून पुढच्या काळामध्ये एकही नागरिक भटके मुक्त आदिवासी नागरिकत्व च्या पुराव्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही इंगळे साहेब यांनी दिली सूत्रसंचालन नीता इंगळे यांनी केले प्रस्तावना विशाल पवार यांनी केली हा कॅम्प जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कॅम्प पार पडला. या कॅमसाठी मार्गदर्शक नाईफ तहसीलदार इंगळे , सर्कल नवले, तलाठी देसुरकर, तलाठी वास्ते, खर्डा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बहिर, तसेच ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओव्हाळ, ग्रामपंचायत स्टाफ, सर्कल स्टाफ, ग्रामीण विकास केंद्राच्या कार्यकर्त्या उर्मिला कवडे, शितल कवडे ,नीता इंगळे, भीमराव सुरवसे, मंगलसिंगाने ललिता काळे ,कमलबाई, आशाबाई दिलीप काळे ,उषा काळे, अनुसया पवार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment