पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२६सप्टेंबर
काही दिवसांपासून चर्चेत असलेले कुसडगांव येथील राज्य राखिव पोलीस दल (SRPF सेंटर)हे प्रा.राम शिंदे हे गृह राज्यमंत्री असताना मंजूर करण्यात आले होते. सदर SRPF सेंटर हे २०१७ साली मंजूर करण्यात आले होते. त्या वेळी रोहित पवार यांना कुसडगांव नकाशावर कुठ आहे हे सुद्धा माहीत नव्हते. सदर प्रोजेक्ट करीत तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्त यांच्या बहुमताने ठराव मंजूर करत जागा देण्याचे गावकऱ्यांनी मान्य केले. तिथून पुढे या प्रोजेक्ट ची वाटचाल चालू झाली. २ वर्ष जागा वर्ग करणे व इतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या परंतु २०१९ विधानसभेत निवडून आलेले रोहित पवार यांनी कुठलाही पाठपूरावा केला नाही. फक्त लोकांची खोट बोलून दिशाभूल केली. प्रा.राम शिंदे विधानपरिषद आमदार झाल्यावर कळले की हा प्रकल्प जळगाव येथे जात आहे. गेली अडीच वर्षे या निकामी आमदाराने काहीच केले नाही. त्यानंतर गावातील सर्व ग्रामस्त आ. राम शिंदे यांच्याकडे जाऊन सर्व परीस्थिती सांगत हा प्रोजेक्ट गेला नाही पाहिजे असे निवेदन केले. मात्र आता हे सेंटर पुर्ण होत असताना आ. रोहीत पवार हे या कामाचे श्रेय घेण्याच्या प्रयत्न करत आहेत.
परंतू आमदार राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरून व सर्व पाठपूरावा करून सदर प्रोजेक्ट चालू तर केलाच परंतु आपल्या भाजपा सरकार करुन भरीव निधी देखील आणला व आज हे वैभव उभा राहिले आहे. परंतु रोहित पवार यांची इवेंट मॅनेजमेंट कंपनी जाईल तिथे फक्त खोट्या कामाचे श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थानी आमदार राम शिंदे यांचे पोस्टर लाऊन रोहित पवार यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आपण न केलेल्या कामाचे श्रेय घेणारे आ.रोहित पवार यांना आगामी निवडणुकीत जनता त्यांचे उत्तर देईल असा घनाघात सभापती पै.शरद कार्ले यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment