पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ सप्टेंबर
कर्जत-जामखेडचे लोकप्रिय आमदार श्री. रोहित पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जामखेड तालुक्यातील खर्डा येथे एकूण 25 कोटी 15 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम देशाचे माजी कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. खा. श्री. शरदचंद्र पवार आणि कोल्हापूर लोकसभेचे मा. खा. श्री. छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज मा. श्री. युवराज भूषणसिंहराजे होळकर, अहिल्यानगरचे मा. खा. श्री निलेश लंके, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मा. श्री. प्रवीणदादा गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा ऐतिहासिक सोहळा खर्डा येथील शिवणपट्टण किल्ल्यावर शनिवारी (२८ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता होणार आहे.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात गेल्या पाच वर्षात कोट्यावधी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून ती पुर्ण करण्यात आली. यावेळी ७ कोटी रुपये खर्चाच्या शिवणपट्टण किल्ल्याचे मजबुतीकरण व दुरुस्तीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार असून या कामाचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. यासोबतच ३ कोटी १५ लाख रुपये खर्चाच्या वखार महामंडळाच्या गोदाम बांधकामाचे आणि 15 कोटी रुपये खर्चाच्या खर्डा ते जामखेड रस्त्याचे काम पूर्ण झालं असून या विकासकामांचे लोकार्पण मा.खा.श्री शरदचंद्र पवार साहेब आणि मा.खा. श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी मा. श्री. युवराज भूषणसिंहराजे होळकर, खा.निलेश लंके, प्रविणदादा गायकवाड हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यात इतिहासाशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण पुस्तकांचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सध्या जोरदार तयारी चालू असून मतदारसंघातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment