क्रिडा व युवक सेवा संचलनालय पुणे व अहील्यानगर जिल्हा क्रिडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मल्लखांब व रोपमल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण जामखेडच्या संघाने दमदार कामगिरी करत उज्वल यश मिळविले.
नुकत्याच पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटात स्वरदा खंडागळे~प्रथम,तन्वी गर्जे~द्वितीय,आरती राळेभात~तृतीय,पद्मजा देशमुख~चतुर्थ तर सायली वाव्हळ हिने पाचवा क्रमांक मिळविला......
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात आझाद टेकाळे~चतुर्थ,पवन जाधव~पाचवा तर ओमकार टेकाळे याने सहावा क्रमांक मिळविला. वय १७ वर्षाखालील गटात अंकीता जाधव~प्रथम,धनश्री टापरे द्वितीय,वैष्णवी जगदाळे~तृतीय तर अनंन्या जरे हिने सहावा क्रमांक मिळविला वय १९ खालील गटात अमित जाधव याने द्वितीय क्रमांक मिळविला .या सर्व विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक करुन अभिनंदन केले जात आहे
या सर्व विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी श्री.शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे श्री.संभाजीराव भिडे गुरुजींच्या आशिर्वादाने प्रशिक्षक ७५ वर्ष वयाचे श्री.शिवाजीराव खंडागळे नाना व कोच कु.सायली दळवी हे वर्षभर न चुकता व कसलाही मोबदला न घेता अगदी मोफत मल्लखांब व रोपमल्लखांब याचे प्रशिक्षण लोकमान्य शाळा येथे देतात आणि या सर्वांच्या मेहनतीचे फळ आज मिळाले असे विद्यार्थी सांगताना दिसतात प्रत्येक गावात मल्लखांब पोहचविण्याचे कार्य खंडागळे नाना यांनी केले आहे .
राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणची अजुन एक उल्लेखनीय कामगिरी म्हणजे या वर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेत सामिल झालेल्या सर्वच्या सर्व मुलींनी आपली विजयी घोडदौड सुरुच ठेवली असुन हा एक मानाचा तुरा या ग्रुपच्या शिरपेचात खोचला गेला आहे.
No comments:
Post a Comment