पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ग्रामपंचायतची जुनी इमारत ही धोकादायक व पाडण्याच्या स्थितीत झाली असून या ठिकाणी चारही बाजूंनी ग्रामस्थांची सतत वर्दळ असते अचानक काही दुर्घटना घडली असल्यास त्यामुळे नागरिकांचे जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे ती इमारत लवकरात लवकर पाडावी अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे खर्डा ग्रामस्थ व युवकांनी केली आहे.
यापूर्वी ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे इमारत पाडण्याचा ठराव बहुमताने पारित केला होता, गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला आहे, जिल्हा परिषद सामान्य प्रशासन व विभागाचे निर्लांकन आदेश असतानाही ही खर्डा ग्रामपंचायतची जीर्ण झालेले धोकादाक इमारत पाडण्यास टाळाटाळ का केली जाते असा सवाल खर्डा येथील युवकांनी केला आहे. पुढील अनर्थ व दुर्घटना व जीवित हानी टाळण्यासाठी आम्हा ग्रामस्थांना उपोषणाचा अवलंब करावा लागेल. तसेच लवकरात लवकर आमच्या मागणीची ग्रामपंचायतने दखल घ्यावी अन्यथा प्रशासनाला कोणतीही पूर्व सूचना न करता तीव्र आंदोलन छेडली जाईल असा इशारा आकाश पवार, बबलू सुरवसे, योगेश सुरवसे, गणेश सूळ,गणेश नेहरकर, सोनाजी सुरवसे, तौफिक तांबोळी, निवृत्ती चव्हाण, मिलन कांबळे, सचिन सुरवसे, अक्षय सकट, मुकेश डोके,प्रशांत कांबळे, पृथ्वी चव्हाण, सोनू विटकर, अतुल सुरवसे यांनी दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रती माननीय तहसीलदार साहेब जामखेड, गटविकास अधिकारी पंचायत समिती जामखेड, सहाय्यक पोलीस निरीक्षक खर्डा पोलीस स्टेशन व खर्डा ग्रामपंचायतला दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment