आदर्श शिक्षण संस्था धाराशिव डी फार्मसी चे विद्यालय विद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी २७ वर्षांनी पंढरपूर येथे एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २७ वर्षांनी एकत्र आलेल्या विद्यार्थ्यां-विद्यार्थिनींनी एकत्र येत स्नेह मेळाव्यात सहभाग नोदवला. पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेऊन नागेश भास्करे यांच्या अध्यक्षतेखाली स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व खेळणी च्या वातावरणात साजरा झाला. मोठ्या कालावधीनंतर एकत्र आलेले अनेक जण मित्र गण हे भक्तगण म्हणून मैत्रीच्या खेळात पांडुरंगाचा खेळ खेळत एकत्र आले.एकमेकांना आपुलकीने चौकशी करत होते.
वृक्षारोपण करून, ज्ञानदानाची ज्योत पेटवली तसेच वर्गमित्र, जुन्या आठवणी काढून कार्यक्रमास सुरुवात झाली. मूलबाळ किती, शाळेत जातात का?आई-वडिलांची तब्येत कशी, तुझी तब्येत कशी, संसाराचा गाडा कसा चालला आहे, अशा विविध प्रश्नांची आपुलकीने चौकशी करताना दिसून आले.अतिशय सुंदर दोस्ती पर मैत्रीचे व देशभक्तीपर गीते सादर करत दुपारच्या सत्रामध्ये विविध फनी गेम्स घेण्यात आल्या.तसेच प्रत्येकाने आपला स्वपरिचय करुन निरोप समारंभ वेळी उपस्थितीतच्या भावना अनावर झाल्या. हे सर्व फार्मासिस्ट मिळून जनकल्याणासाठी धोरणे आखले नवीन काहीतरी करण्याची उमेद बाळगून निरोप घेतले.
यावेळी संतोष थोरात, धनंजय आनंदे ,प्रदीप व्हटकर ,सुधीर फुगे, महेश पखाले, अण्णा झाडे, मीना पाखरे, संतोष तिवारी, काशिनाथ ओनासे, जया बेलपत्रे, किरण स्वामी, जया शेजाळ, सरोज आरनाळे ,कालिका पोद्दार, अर्चना वाघमोडे, अनिल वाघमोडे, विजय पाटील यांच्यासह अनेक विद्यार्थी सहभाग घेऊन कार्यक्रम आनंद द्विगुणित केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण स्वामी अर्चना वाघमोडे यांनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment