पोलीस वारंट न्यूज नेटवर्क९ नोव्हेंबर २०२४ –
सरकारी व्यवस्था कोणत्याही घटकाला न्याय देताना मतांच्या गाठ्याचा विचार करत असेल तर पत्रकारांकडेही देखील मतांचा गठ्ठा असुन त्याचा मागण्याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची अथवा पक्षाची भूमिका व विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार व वृत्तपत्र ही माध्यमे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी सदर सभागृहात पत्रकार व वृत्तपत्रांच्या प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडविण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने जामखेड येथील सहारा सभागृहात दिवाळी भेटवस्तू आणि मिठाई वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते झाले. या विशेष प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मा. वसंतराव मुंढे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नुकत्याच पार पडलेल्या ‘दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा’ पुस्तिकेचे प्रकाशन आणि डॉ. आरोटे यांच्या संपादना खालील समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे अनावरण करण्यात आले. डॉ. आरोटे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या महत्त्वावर प्रकाश टाकत मतदारांच्या गाठ्यांप्रमाणे पत्रकारांच्याही मागण्यांकडे शासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, जिल्हा निवड समिती अध्यक्ष फायकअल्ली सय्यद, तालुकाध्यक्ष दत्तात्रय राऊत,संजय वारभोग, सुदाम वराट, अविनाश बोधले, अशोक वीर, श्वेता गायकवाड, किरण रेडे, अजय अवसरे,सैफअली सय्यद, राजू भोगिल, संतोष थोरात, किशोर दुषी, धनशिंग साळुंखे, बाळासाहेब शिंदे, मान्यवर पत्रकार उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष गर्जे यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश बोधले यांनी केले.
जामखेड येथे झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांच्या योगदानाची दखल घेत दिवाळीच्या निमित्ताने त्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यामध्ये पत्रकार आणि माध्यमांच्या सामूहिक मतांच्या शक्तीबाबतही चर्चा झाली.
No comments:
Post a Comment