पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२०डिसेंबर२०२४
जामखेड तालुक्यातील खर्डा हे शहर पर्यटकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असणारे शहर मानले जाते या शहरामध्ये काही मागील काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. चोरी होऊ नये याकरिता खर्डा येथील शिवपट्टन विकास युवा मंचाचे अध्यक्ष गणेश ढगे यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की
खर्डा शहरातील चोरीचे प्रमाण वाढत असल्याने गावातील बंद पडलेले एलईडी पददिवे व गावातील महत्त्वाच्या चौकामध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावे.
आपल्या कार्यालयास शहरातील एल.ई.डी पतदिवे चालू करण्याबाबत व गावातील व्यापारपेठ महत्वाच्या चौकामध्ये सी.सी.टी.व्ही बसविण्याबाबत मागणी व चर्चा केली आहे परंतु अदयाप पर्यंत कोणतीही उचित कार्यवाही झालेली नाही. सध्या खर्डा शहरामध्ये चोरीचे प्रमाण वाढत आहे शेतकरी बांधवाची काही दिवसापूर्वी मोठया प्रमाणात सोयाबीन चोरीस गेलेली आहे व दुकान फोडीची घटना घडलेल्या आहेत. तरी या अनुषंगाने खर्डा शहरामध्ये त्वरीत व्यापारपेठ व महत्वाच्या चौकामध्ये सी.सी.टी.व्ही बसविण्यात यावी व शहरात बसविण्यात आलेले एल.ई.डी पतदिवे ते त्वरीत दुरूस्त करून चालू करण्यात यावे.
तरी वरील दोन्ही अतिमहत्वाच्या बाबी लक्षात घेऊन आपण त्वरीत योग्य कार्यवाही करावी अशी मागणी गणेश ढगे यांनी निवेदनाद्वारे खर्डा ग्रामपंचायतीला केली आहे .या निवेदनावर डॉ.बिपीनचंद्र लाड, ओंकार इंगळे, रोहन चावणे ,आसिफ सय्यद यांच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment