पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२०जानेवारी२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अयोध्या श्रीराम प्रभू मंदिरामध्ये विराजमान झाले त्या प्रित्यर्थ व त्याच दिवशी खर्डा येथे ही श्री राम प्रभूच्या मंदिराचे शुभारंभ करण्यात आला होता.दिनांक २२ जानेवारी रोजी वर्धापन दिन सोहळा खर्डा येथे मोठ्या दिमाखात साजरा होत आहे.त्या दिवशी सकाळी आठ वाजता श्रीराम प्रभूच्या प्रतिमेची ग्राम प्रदक्षिणा फेरी सकाळी 11 वाजता निघणार आहे. रामायण मधील एक अध्याय वाचन दुपारी एक वाजता महाप्रसाद होणार आहे. लोकवर्गणीतून प्रभू श्रीराम मंदिराचे बांधकाम सुरू होणार असून याचे नियोजन कस्तुरीबाई मठाचे १०८ महंत पागल बाबा संन्यासी व समस्त भक्त गण यांनी केले आहे.या मठात नवनाथ ग्रंथ वाचन चालू असून दररोज शेकडो भाविक उपस्थित असतात.या ठिकाणी लहान मुलामुलींना अध्यात्माचे धडे दिले जातात.खर्डा येथील शनी मारुती मंदिरासमोर या कार्यक्रमाचे आयोजन केले असून खर्डा व पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कस्तुरबाई मठातील भक्त गण यांचे वतीने करण्यात आले आहे.उद्या होणारा वर्धापन दिन सोहळा प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून खर्डा शहरातून मिरवणूक निघणार आहे,यासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भक्तगणांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा