पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/23 फेब्रुवारी 2025
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत अव्यध्य दारू विक्री सर्रासपणे चालू आहे. अशातच खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण येथील नागरिकांने दारू विक्री बंद करण्यात यावी म्हणून खर्डा पोलिसांना तोंडी तक्रार देऊन आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर खर्डा पोलिसांना जाग आली आहे .
आहिल्यानगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तालुक्यातील अव्यध्य धंदे बंद करनेबाबत जामखेड तालुक्यातील पोलीस स्टेशनला सूचना दिल्या असताना देखील जामखेड तालुक्यात अव्यध धंदे सर्रासपणे चालू आहेत. आता नागरिकांनीच धंदे बंद करा म्हणून पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील देवदैठण गावात दारू विक्री चालू असल्याची माहिती मिळाली असून त्या इसमान विरुद्ध खर्डा पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून जामखेड तालुक्यातील देवदैठण गावातील काही इसमांकडून अवैध दारू विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेत चार इसमांचा समावेश आहे. पोलीस पाटील भोरे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलीस अधिकारी व गावातील नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली आहे .
या घटनेत कचरू बाजीराव जावळे (वय 45 वर्ष), विष्णू राजेंद्र उगले (वय 29 वर्ष), साहेबराव लक्ष्मण भोरे (वय 67 वर्ष), आणि साहेबराव श्रीपती महारनवर (वय 78 वर्ष) यांचा समावेश आहे. सर्व इसम रा. देवदैठण ता. जामखेड येथील आहेत.यांच्याकडून या कारवाईत एकूण 12,355/- रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असून सदर इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधिकारी व गावातील नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.
चौकट -
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे अवैद्य धंदे सुरू आहेत पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर क्लब सुरू आहेत ,तसेच मटका जुगार ,देशी दारू ,अवैद्य हॉटेल , क्लब सुरू असताना देखील पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे .आता देवदैठण अवैद्य दारू विक्री कारवाईनंतर आता खर्डा हद्दीतील अवैद्य धंद्यांवर पोलीस करणार का ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment