पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/3फेब्रुवारी 2025
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील जातेगाव ग्रामपंचायतच्या महीला सरपंचाच्या पतीवर हल्ला केला असून याप्रकरणी दोन जणांना खर्डा पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, काल दि. २ जानेवारी रोजी सकाळी १० :१५ वाजताचे सुमारास जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनचे हद्दीतील जातेगाव शिवारातील ऩिपाणी फाटा, येथे यातील फिर्यादी गणेश पांडुरंग गायकवाड (वय ४५) हे घटनेतील आरोपी तीन यास तु शेतामधील सरपण पेटविल्यामुळे आमच्या शेतामधील जनावरासाठी ठेवलेला भुसा जळाला आहे. असे समजावुन सांगत असताना साक्षीदार पांडुरंग गायकवाड यांची गचांडी धरली होती. त्यानंतर फिर्यादी व साक्षीदार हे मोटार सायकलवरून खर्डा येथे जात असताना यातील आरोपींनी मोटार सायकलवरून पाठलाग करत फिर्यादीचे मोटार सायकलला आपली मोटारसायकल आडवी लावुन आरोपी क्र. एक याने फिर्यादीचे वडीलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व आरोपी क्र. दोन याने त्यांचे उजवे हाताचे मनगटावर कु-हाडीच्या तुंब्याने मारून गंभीर दुखापत केली. ते ओरडु लागल्यामुळे फिर्यादी सोडविण्यास गेले असता दुस-या मोटार साकल वरून आलेले आरोपी क्र.3 व 4 यांनी अंगावर धावुन जावुन आरोपी क्र.3 याने हातात दगड घेवुन फिर्यादीचे डावे बरगडीवर,मानेवर मारून दुखापत केली.आरोपी क्र.4 याने फिर्यादीचे वडील पांडुरंग यांचे उजवे खुब्यावर दगड मारून जखमी केले आहे.फिर्यादीचे वडील मोठमोठ्याने ओरडु लागल्यामुळे आरोपी क्र.1 ते 4 हे त्या ठिकाणावरून पळुन गेले आहे.फिर्यादीचे गणेश पांडुरंग गायकवाड.वय-45 वर्षे.धंदा-शेती.रा-जातेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १)युवराज अमृत पाटील, २)शिवराज कमलाकर पाटील, ३)रविराज कमलाकर पाटील, ४)अमृत भिकाजीराव पाटील सर्व रा-जातेगाव.ता-जामखेड यांचे विरूद्ध गु.रजि.नं व कलम- 14/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(2), 118(1), 326(फ), 126(2), 115(2), 351(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी युवराज गायकवाड (वय २१) (पाटील ) व वरविराज गायकवाड (पाटील ) वय ३०) यांना अटक करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलीस हवालदार संभाजी शेंडे, पोलीस अंमलदार पंडित हंबर्डे, शशिकांत म्हस्के, विष्णू आवारे यांनी केली. घटनेत फिर्यादी स्वत व त्यांचे वडील पांडुरंग किसन गायकवाड हे जखमी झाले असून त्यांचे जामखेड येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस हेडकॉन्टेबल एस.व्ही.शेंडे हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा