दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा महाविद्यालय जामखेड येथे भरवण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा येथील विद्यार्थी व निवारा बालगृहात परिस्थिती गरीब असल्यामुळे निवासी राहून भविष्य घडवण्याची वाटचाल करत असलेला सुरज पोते यांने लांब उडी उंच उडी गोळा फेक रनिंग या वैयक्तिक गेम मध्ये प्रथम क्रमांक मिळून मोहा शाळेचे नाव उंचावले आहे तसेच ज्या निवारा बालगृहात निवासी राहतो त्या बालगृहाचे नाव उंचावले आहे.खरंतर परिस्थितीतून आलेला विद्यार्थी चिकाटीने जीव ओतून बेभान होऊन कसरत करतात या सुरज कडे पाहिल्यानंतर दिसतंय सुरज पोते याला घडवण्यामध्ये मुख्याध्यापक संतोष हापटे सर म्हलारी पारखे सर .रजनीकांत साखरे सर तसेच अँड.डॉ.अरुण (आबा) जाधव (ग्रामीण विकास केंद्र संस्थापक अध्यक्ष) निवारा बालगृहाचे अधीक्षक .वैजीनाथ केसकर सर व व्यवस्थापक संतोष चव्हाण, संचालक बापू ओहोळ, तुकाराम शिंदे सर यांनी जीव ओतून काम केले आहे.आणि तेच आज सर्वांना सुरज पोते याच्या माध्यमातून दिसत आहे.
यावेळी साकत केंद्राचे केंद्रप्रमुख नवनाथ बडे साहेब तसेच जामखेड बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी जालिंदर खताळ साहेब पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विजय शेवाळे साहेब जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभम जाधव साहेब यांनी 2025 क्रीडा स्पर्धेच्या यशाबद्दल मोहा शाळेचे व निवारा बालगृहाचे अभिनंदन केले .
येत्या 14 तारखेला सुरज पोते जिल्हास्तरीय खेळणार असल्यास त्याला शुभेच्छा देण्यात आल्या
No comments:
Post a Comment