पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१० फेब्रुवारी2025
प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र राज्यात दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ या कालावधीत इयत्ता १२ वी व दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत इयत्ता १० वीची बोर्ड परिक्षा होत आहे. सदरच्या दोन्ही परीक्षा शांततेत व सुरळीत पार पाडाव्यात म्हणून कर्जत व जामखेड तालुक्यातील परीक्षा उपकेंद्राचे परिसरामध्ये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) चा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याची करण्यात आले असुन . कर्जत उपविभागातील कर्जत व जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्राचे हद्दीत सदर प्रतिबंधात्मक आदेश अंमलबजावणी करण्याच्या काटेकोर सुचना केली कर्जत उपविभागात येणारे परिक्षा केंद्र चालक,शिक्षण विभाग, पोलीस स्टेशन व संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
त्यानुसार कर्जत भाग कर्जत उपविभागीय दंडाधिकारी, नितीन पाटील यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (३) अन्वये दिलेले आदेश खालील प्रमाणे
१) दिनांक ११/०२/२०२५ ते दिनांक १८/०३/२०२५ या कालावधीत कर्जत व जामखेड तालुक्यातील परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात पुढील अपवाद वगळता, कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परीक्षार्थी, परीक्षेचे कामासाठी परीक्षा केंद्र प्रमुख यांनी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी व वाहने तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती.
२) परीक्षा ठेवण्यात आलेल्या केंद्राच्या व उपकेंद्राचे २०० मीटर परिसरात असलेले झेरॉक्स मशीन/फॅक्स मशीन, सार्वजनिक टेलीफोन/एसटीडी/आयएसडीबुध, ध्वनीक्षेपण व तत्सम उपकरणे परीक्षा सुरु असलेल्या वेळात सुरु ठेवता येणार नाही.
३) परीक्षा ठेवण्यात आलेल्या केंद्रात २०० मीटर परिसरात मोबाईल फोन, पेजर, संगणक, लॅपटॉप इत्यादी साहित्यांचा परीक्षा सुरु असलेल्या वेळेत वापर करता येणार नाही.
सदरचा आदेश परीक्षार्थी, परीक्षेचे कामासाठी परीक्षा केंद्र प्रमुख यांनी नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी यांची वाहने तसेच उपविभागीय दंडाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्ती यांना लागु होणार नाही. सदरचा आदेश दिनांक २२/०१/२०२५ रोजी कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी जारी केले आहेत. सदर आदेशानुसार कॉपी पुरवणाऱ्या व 200 मीटर परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या पालक, नातेवाईक व मित्रांवर कडक कारवाई करणार गेल्यावर्षीपेक्षा हयावर्षी अधिक पोलीस बंदोबस्त पुरवणार खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील परिक्षा केंद्र चालक व संबंधितांनी सदर आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करणार असे आवाहन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment