पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/११ फेब्रुवारी २०२५
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या 100 दिवसीय कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय माहिती बाबत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने आज दि 11 फेब्रुवारी2025 रोजी जामखेड महाविद्यालयात नवीन कायदे कार्यशाळा, निर्भया कन्या अभियान तसेच पोलीस काका/पोलीस दिदी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मार्गदर्शन करून संवाद साधला आहे.
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी हा उपक्रम पोलिस स्टेशनच्या वतीने राबवण्यात आला आहे.यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती देताना म्हणाले शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळा तसेच तसेच घरबसल्या ऑनलाइन तक्रार कशी करावी यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती दिली आहे . तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या तक्रारी तसेच छेडछाड बाबत संपर्क साधावा याकरिता सूचना दिल्या, वाहतूक आणि रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे , महिला सुरक्षा , नवीन कायदा , तसेच एक भारत देशाचा सुजन नागरिक कसा असावा एक दक्ष नागरिक म्हणून नागरिकांचे काय कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चासत्र घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, प्राचार्य डॉ. डोंगरे सर एनसीसी विभाग प्रमुख केळकर सर, प्राध्यापक वर्ग विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment