पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९ फेब्रुवारी2025
आहिल्यानगर जिह्यातील जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत परप्रांतीय कामगाराला जबर मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जनाविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करत. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केले आह
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विजय ओमप्रकाश चौरासिया वय-३२ वर्ष धंदा-मजुरी रा. पडरोना जिल्हा कुसीनगर (राज्य उत्तरप्रदेश) हल्ली रा. खर्डा रोड महावीर बर्फ कारखाना जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी म्हटले आहे की ते सुमारे ८ वर्षापासुन दिलीप फुलचंद गांधी यांच्या महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहे.दि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. सुमा. बर्फ कारखान्यामध्ये एकटाच काम करत असताना सुरेश आप्पा क्षीरसागर, शुभम अमृत पिंपळे दोघे रा. आरोळे वस्ती. मनोज सुरेश जगताप रा. म्हाडा कॉलनी जामखेड
या तिघांनी काही एक कारण न सांगता शिवीगाळ करुन त्यांचे हातातील दगडाने माझे पायाच्या नढगीवर व डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करु लागले. यावेळी सुरेश आप्पा क्षीरसागर हे म्हणत होता की याचा पाय तोडा जेणेकरुन हा काम करणार नाही व कारखाना बंद पडेल असे म्हणुन वरिल तिघांनी माझे डोक्यास मागील बाजुस व डाव्या पायाचे नढगीवर दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले.
मारहाण करतांना मोठमोठ्याने ओरडत असल्याने तेथे जवळ असलेले साई ट्रन्सफॉर्म या दुकानातील मॅनेजर महेश कसबे व अरुण देवकाते यांनी मला वाचविण्यासाठी त्या तिघांवर प्रतिदगड फेक केली तेव्हा आरोपी तेथुन पळुन गेले त्यानंतर महेश कसबे यांनी दिलीप फुलचंद गांधी यांना सदरचा प्रकार सांगितला
पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून शहरातील समर्थ हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले.मारहाणीत डोक्यात मागील बाजुस ६२ टाके पडले व डावा पाय नढगीजवळ फ्रैक्चर झाला आहे.उपचारा दरम्यान पुर्ण शुध्दिवर आल्यानंतर पोलिसांना फीर्यादी यांनी जबाब दिला त्यानुसार सुरेश आप्पा क्षीरसागर, मनोज सुरेश जगताप, शुभम अमृत पिंपळे या तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी तीघांनही आरोपींना तात्काळ अटक केली आहे.सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment