जामखेड शहरात रात्री दरोडा घालणाऱ्या टोळीतील सात आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आले आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी 17,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार दिनांक 26/02/2025 रोजी रात्री 02.00 वाजता जामखेड शहरातील साकत फाटा येथे एका कुटुंबाच्या घरावर दरोडा घालण्यात आला. एक महिलेने "दिदी दरवाजा खोलो" असा आवाज दिल्यानंतर घराचा दरवाजा उघडला आणि तोंडाला रूमाल बांधून असलेले 7 ते 8 आरोपी चाकुसारखे हत्यार घेऊन घरात घुसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून फिर्यादी, तिची बहीण व आई यांचे अंगावरील सोन्याचे दागीने व घरातील पैसे जबरीने चोरून नेले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे 1). अनिल मच्छिंद्र पवार, वय 32, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव2.)सुनिल धनाजी पवार, वय 19, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव3.)संतोष शिवाजी पवार, वय 22, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशिव4.) रमेश मत्या काळे, वय 47, रा.म्हसा खांडेश्वरी, ता.कळंब, जि.धाराशीव
5.)बाबा आबा काळे, वय 25, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव6.)अमोल सर्जेराव काळे, वय 23, रा.लक्ष्मीपेढी, तेरखेडा, ता.वाशी, जि.धाराशीव7)शिव अप्पा पवार वय 24, रा.बावी, ता.वाशी, जि.धाराशीव असे आरोपींचे नावे आहेत
पोलिसांनी आरोपींकडून मारुती सुझुकी कंपनीची इरटिगा गाडी, महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी आणि चार मोबाईल जप्त केले आहेत. एकूण 13,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी बाबा आबा काळे याने सांगितले की गुन्ह्यातील काही दागीने शालन अनिल पवार व अनिल मच्छिंद्र पवार यांनी विकले आहेत.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि तपास पथक कार्यरत आहे. आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी , अंमलदार यांनी केली आहे
सदर घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment