खर्डा प्रतिनधी/२९ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 1000 लिटर क्षमतेचा RO वॉटर प्युरिफायर आणि चिलर बसवण्यात आला आहे. या महत्त्वाच्या सुविधेचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते आज दि 29 मार्च रोजी करण्यात आले आहे. हा उपक्रम डेक्कन मेकॅनिकल अँड केमिकल इंडस्ट्रीज (DEMEVH) यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी वापरून अंमलात आणण्यात आला आहे यामुळे आता विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्यास मिळणार आहे.तसेच वॉटर फिल्टर बसवल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
ही सुविधा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन लोळगे यांच्या मागणीमुळे आणि पुणे डेक्कन मेकॅनिकल अँड केमिकल इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष नागेश भगवान कोरे यांच्या प्रयत्नांतून शक्य झाली आहे. यावेळी उपस्थित आमदार रोहित पवार, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर,विद्यालयाचे मुख्याध्यापक मुस्तफा सय्यद, पर्यवेक्षक गदादे सर, भगवान कोरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत लोखंडे,शिवाजी भोसले, दत्तात्रय भोसले, श्री. गोलेकर, मदन पाटील, रामहरी गोपाळघरे, सुनील गीतेंसह शाळेचे शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा