पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/४ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये अवैध दारू विक्रीमुळे महिला आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. देवदैठण, नायगाव, धामणगाव येथे दारू बंदीची मागणी वाढत आहे. अशातच काही दिसांपुर्वीच ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने अवैध दारू विक्री रोखण्यासाठी छापे टाकले आहेत. या सर्व प्रयत्नांमागे तरुण पिढीचे व्यसनाधीन होणे आणि महिलांचे संसार उद्ध्वस्त होणे ही मुख्य कारणे आहेत.
जामखेड तालुक्यात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, ज्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. महिलांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत, त्यामुळे महिला दारू बंदीची मागणी करत आहेत. देवदैठण येथे ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने अवैध दारू पकडली होती आणि खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र, पुन्हा खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील देवदैठण गावात चोरून दारू विक्री होत आहे असे ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू आहे.
तसेच खर्डा हद्दीतील नायगाव येथील ग्रामस्थांनी दारू बंदी करण्यात यावी याचे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी गावातील बेकायदेशीर दारू विक्री बंद झाली पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे अन्यथा नायगावकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे आता पुन्हा खर्डा हद्दीतीलच धामणगाव गावात ग्रामस्थांनी बैठक घेऊन दारू विक्री रोखण्याचा निर्णय घेतला आहे. धामणगाव येथील सरपंच महारुद्र महारनवर व निलेश महारनवर (मेजर) यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी दारु बंदी विरोधात बैठक घेतली तसेच येथुन पुढे गावात दारु विक्रीचा प्रयत्न कोणी करु नये असा निर्णय घेण्यात आला. याला ग्रामस्थांनी देखील पाठिंबा दिला आहे. खर्डा परिसरातील गावांमध्ये दारु बंदीची मागणी वाढत असल्याने या सर्व प्रयत्नांमुळे खर्डा हद्दीतील गावातील दारू विक्री कायमस्वरूपी बंद होणार? पोलीस दारू विक्रीत्यांवर कारवाई करणार? असा प्रश्न व चर्चा खर्डा हद्दीतील नागरिकांमध्ये होत आहे.
No comments:
Post a Comment