खर्डा प्रतिनधी/२९ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे काल शुक्रवार, दिनांक 28 मार्च रोजी दुपारच्या सुमारास जातीय अत्याचाराची एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, या सर्व प्रकरणात फिर्यादी ओंकार परमेश्वर इंगळे हे आहेत. ओंकार इंगळे हा मागील कार्यकाळातील खर्डा गावचे राष्ट्रवादीचे माजी सरपंच शिवकन्या इंगळे यांचे पुत्र आहेत. याविरुद्ध आरोपींच्या यादीत प्रताप वैजीनाथ पाटील आणि विराज उर्फ मनोज नानासाहेब पाटील यांची नावे आहेत.
व आरोपी प्रताप पाटील हे खर्डा गावच्या भाजपाच्या विद्यमान महिला सरपंच यांचा मुलगा आहे, तर आरोपी विराज पाटील त्यांचा पुतण्या आहे. या प्रकरणात आरोपींनी जातीवाचक शिविगाळ केल्यानंतर, लोखंडी पाईपाने मारहाण करून ओंकार इंगळे यांना जखमी केले. यावेळी आरोपींनी परत येऊ नकोस नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली. सदर फिर्यादीच्या तक्रारीनुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी ओंकार इंगळे यांच्यावर आरोपी क्रमांक1)प्रताप पाटील याने "ढोरग्या भिकाऱ्या तू इथे का आला, तुझी लायकी आहे का?" अशी जातीवाचक शिविगाळ केली. नंतर आरोपी क्रमांक 2) विराज पाटील याने लोखंडी पाईपाने मारून ओंकार यांना डोळ्याच्यावर कपाळावर जखमी केले. आरोपींनी फिर्यादीला खाली पाडून घाण घाण जातीवाचक शिविगाळ केली व पुन्हा येऊ नकोस, नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली.व फिर्यादीच्या तक्रारीनुसार यातील आरोपी क्रमांक1) प्रताप वैजीनाथ पाटील 2)विराज उर्फ मनोज नानासाहेब पाटील यांच्यावर अट्रोसिटीचा खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे हे करत आहेत.
चौकट
सदर गुन्ह्यानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. खर्डा गावातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा