भूम प्रतिनधी/१६ मार्च२०२५
प्रेम प्रकरणातून तरुणाला बेदम मारहाण करण्याची घटना भूम तालुक्यातील दुधोडी येथील १८ वर्षीय तरुण माऊली बाबासाहेब गिरी याच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माऊली गिरी याने १४ दिवस उपचार घेतल्यानंतर मृत्यूशी झुंज संपली आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दि ३ मार्च रोजी परंडा तालुक्यातील पांढरेवाडी येथे माऊली गिरी याला मारहाण करण्यात आली होती. त्याचे पांढरेवाडी येथील एका विवाहित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीचे लग्न झाल्यानंतरही दोघांमध्ये प्रेम संबंध चालू होते. मुलीच्या पतीने व्हाट्सअपवरील संवाद वाचल्यानंतर त्याने माऊली गिरी यास भेटण्यासाठी बोलावले. आल्यानंतर माऊली गिरी याला घरामध्ये कोंडून मुलीचे पती, वडील व अन्य चार ते पाच जणांनी विवस्त्र करून लोखंडी रॉड व काठीने जबर मारहाण केली व त्यानंतर विवस्त्र अवस्थेत त्याला रस्त्यालगत फेकून दिले.आरोपींमध्ये मुलीचे वडील सतीश जगताप, राहुल मोहिते, आकाश मगर, विजय पाटील यांचा समावेश आहे. पोलिसांनी या आरोपींना अटक केली आहे, तर अन्य आरोपी फरार आहेत. माऊली गिरी याच्या किडनीवर व अन्य ठिकाणी जास्त मार लागल्यामुळे त्याने मृत्यूशी झुंज संपली. अंभीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गोरक्ष खरड व पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर घाडगे सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा