जामखेड प्रतिनधी/१८ मार्च२०२५
पुण्यातील खाजगी रुग्णालयात शुक्रवार,दि. 18 एप्रिल 2025 रोजी जामखेड येथील प्रसिद्ध उद्योगपती अशोकलाल चुनीलाल चोरडिया यांचे द्वितीय मुलगा आशिष अशोकलाल चोरडिया यांचे वयाच्या 41 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. जामखेडमधील आमरधाम येथे उध्या शनिवार, दि.19 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
आशिष यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. ते साधुसंतांच्या विहारात सक्रियपणे सहभाग घेत असत. समाजसेवेतही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. त्यांच्या मागे आजी, आई, वडील, पत्नी, एक मुलगा व भाऊ, बहीणांचा परिवार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा