जामखेड प्रतिनधी/१५मे२०२५
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने केलेल्या फसवणुकीची एक वाईट घटना आहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडली आहे. यामध्ये आठ ते दहा जणांनी एका तरुणास मारहाण करून त्याच्याकडून 11 लाखांचा अवैध लाभ घेतला. ही घटना बुधवार दि 14 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कुसडगाव रस्त्यावरील पुलाजवळ घडली. या प्रकरणात पोलिसांनी आठ ते दहा जणांवर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेड पोलीस स्टेशनकडे आलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय 35 वर्षे) यांना आठ ते दहा जणांनी कुसडगाव रस्त्यावरील पुलाजवळ बोलावले. ते स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत होते. या वेळी त्यांनी राजेंद्र यांना मारहाण करून त्यांच्या कडील 10 लाख रुपये, सोन्याची चैन, चांदीचे कडे, मनगटी घड्याळ व मोबाईल पळून नेले. या प्रकरणात आरोपी अश्विनी, अतुल व सोबतचे आठ ते नऊ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली आणि तपास सुरू केला. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.
कोट
जामखेड तालुक्यात ही घटना घडल्याने स्थानिक लोकांमध्ये भीती व खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस दल विशेष प्रयत्न करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा