आहिल्यानगर प्रतिनधी/१९मे २०२५
शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांच्या वाहनाचा शनिवारी (ता. १७) मध्यरात्री जामखेड रोडवरील सारोळा बद्दी शिवारात अपघात झाला. त्यात तलाठी महेंद्र काळे (रा.केडगाव) यांचा उपचार सुरू असताना मृत्यु झाला.
तर सातपुते व चालक हे जखमी झाले आहेत. सातपुते हे रात्री आपल्या वाहनाने अहिल्यानगरकडे येत होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. अपघातात सातपुते हे बचावले आहेत. तर त्यांचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा