जामखेड प्रतिनधी/१जून२०२५
जामखेड तालुक्यातील टेकाळेनगर येथे विजेचा झटका बसून 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. सायंकाळच्या वेळेस मित्रांसह क्रिकेट खेळताना बॉल स्लॅबवर गेल्यानंतर तो बॉल काढण्यासाठी प्रयत्न करत असताना अचानक विजेच्या मुख्य तारांना हात लावल्यामुळे या दुर्दैवी घटनेला जन्म आला. प्रणव प्रशांत टेकाळे या मुलाचा जागीच मृत्यू झाला; त्याला रुग्णालयात नेण्यात आले तरी उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ही घटना जामखेड शहरातील खर्डा चौकाजवळील टेकाळेनगर परिसरात घडली आहे.
ही आठ दिवसांत जामखेडमध्ये घडलेली तिसरी विजेच्या तारांशी संबंधित मृत्यूची घटना आहे. आठ दिवसांपूर्वीच बाळगव्हाण क्षेत्रात बाप-लेकाचा विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचा प्रकार झाला होता, ज्यावर महिला वायरमनला दोषी मानून मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
घटनेनंतर तीन तासांनंतरही महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत आणि त्यांनी या विषयात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकारामुळे शहरात महावितरणच्या व्यवस्थापनावरुन प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा