खर्डा प्रतिनिधी/26जुलै 2025
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व लोकप्रिय नेत्या मा. ना. पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेलंगशी येथे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली.विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून पंकजाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये मधुकर (आबा) राळेभात, अजय (दादा) काशिद, भगवान (दादा) मुरूमकर, काकासाहेब गर्जे, वैजनाथ पाटील, संजय गोपाळघरे, अमित जाधव, राजू मोरे, भरत आहेर, महालिंग कोरे, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे, नानासाहेब गोपाळघरे, धनसिंग साळुंके यांचा समावेश होता.
याशिवाय मा. सरपंच श्री कांतीलाल जाधव, शालेय समिती अध्यक्ष मा. रेवण ढाळे, मा. भगत मोरे, मा. धोंडिराम चौरे, मुकुंद मोरे, मा. हानुमंत ढाळे, मा. सुहास जायभाय, मा. श्रीराम चैरे, मा. ज्ञानेश्वर चौरे, मा. अशोक पाटील, मा. गणेश गायकवाड, मा. अमोल शिरोळे, मा. दादाराव जायभाय, संतोष गोरे (मुख्याध्यापक), सुशेन चेंटमपल्ले, विजयकुमार रेणुके, अशोक जाधव, रवींद्र धस, विकास पाचरणे व पंचक्रोशीतून आलेले ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन गणेश नेहरकर मित्र परिवार, तेलंगशी यांच्या वतीने करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा