खर्डा प्रतिनधी/६ऑगस्ट२०२५
खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी पोलीस कॉन्स्टेबल शशी मस्के यांचा वाढदिवस पत्रकार व मित्र परिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गावात त्यांच्या कार्यशैलीमुळे मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग असून, विविध ठिकाणी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे.
आज खर्डा येथे पत्रकार आणि मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार धनसिंग साळुंखे, आशुतोष गायकवाड भाजपाचे युवा मोर्चाचे शहरप्रमुख सोनाजी सुरवसे, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे,
रोहिदास केकान,, राजेंद्र चव्हाण, गोकुळ गोलेकर, गणेश गोलेकर, सौरभ पानगावकर, पोते टेलर, बाला गोलेकर, अश्रू यादव, राहुल राऊत, लखन कांबळे, धनाजी सुरवसे मोठया संख्येने युवक उपस्थित होते.यावेळी केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा