नेवासा, दि. ७ ऑगस्ट २०२५ :
नेवासा पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून पोलीस निरीक्षक महेश विष्णु पाटील यांच्या नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या निर्देशानुसार दिनांक ५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
याआधी पोलीस निरीक्षक. महेश पाटील हे नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर येथे कार्यरत होते. पोलीस विभागातील प्रशासकीय गरजा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांची बदली नेवासा पोलिस ठाण्यावर करण्यात आली आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पदभार स्वीकारून कार्यभार स्विकारण्याचा आणि अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा