नेवासा (प्रतिनधी), दि. ८ ऑगस्ट २०२५ :
नेवासा, श्रीरामपूर आणि कोपरगाव तालुक्यांमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा व दरोड्याच्या तयारीसह तब्बल १२ गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला कुख्यात चोरटा डीचन त्र्यंबक भोसले (रा. सलाबतपूर, ता. नेवासा) याला नेवासा पोलिसाच्या स्थानिक गुन्हे पथकाने शिताफीने अटक केली आहे.हा आरोपी मागील चार वर्षांपासून पोलिसांच्या हातातून निसटत होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, नेवासा पोलीस आणि श्रीरामपूर पोलिसांची विविध पथकं त्याच्या सतत मागावर होती. आरोपीने घराऐवजी शेतामध्ये, ऊस व केळीच्या बागांमध्ये लपून राहून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता.पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने सलाबतपूर परिसरात सखोल रिचकी करून वेशांतर करून माहिती मिळवण्याचे काम सुरू ठेवले. अखेर बुधवारी भोसले सलाबतपूर येथील पेट्रोल पंपावर मोटरसायकलस पेट्रोल भरत असताना पोलिसांना दिसला. पोलिसांची भनक लागताच त्याने मोटारसायकल सोडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सुमारे अडीच किलोमीटर पाठलाग करून चिखलात शिरून त्याला अटक केली.आरोपीकडून एक पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, फिंगरप्रिंट तपासाद्वारे नेवासा पोलिसांकडील सौंदाळा आणि तरवडी येथील घरफोडीच्या गुन्ह्यांमध्येही त्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. लवकरच आणखी काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शिंदे, कॉन्स्टेबल नारायण डमाळे, अमोल साळवे, गणेश जाधव आणि सुनील गंगावणे यांच्या पथकाने केली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा