खर्डा प्रतिनिधी /4ऑगस्ट 2025
आज दिनांक 4/8/2025 रोजी खर्डा येथे महसूल व ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खर्डा गावचे सरपंच श्रीमती संजीवनी ताई पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट अरुण जाधव तसेच खर्डा विभागाचे मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे तसेच कृषी अधिकारी प्रशांत पोळ तसेच विविध शासकीय क्षेत्रातील काम करणारे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवनी ताई पाटील म्हणाल्या की, महसूल आणि ग्रामीण विकास केंद्र यांच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळत आहे, तसेच एडवोकेट अरुण जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्वप्न होते ते कुठेतरी गरिबांच्या बाबतीत साकार होताना आज दिसत आहे. तसेच मंडळ अधिकारी प्रशांत पोळ साहेब म्हणाले की अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबवली जात आहे. त्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माहिती दिली. डॉक्टर बिपिनचंद्र लाड म्हणाले की, ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचे काम हे कौतुकास्पद आहे. या कॅम्प साठी उपस्थिती खर्डा येथील पत्रकार संतोष थोरात, धनराज साळुंखे तसेच कृषी अधिकारी श्री सुरेश कटके, तसेच कृषी अधिकारी तात्यासाहेब गोपाळघरे तसेच तलाठी साहेब प्रसाद पारखे , तरडगाव चे तलाठी अजय पवार तसेच मोहरी तलाठी सुजित गोडगे दिघोळ तलाठी राहुल बुक्तारे जातेगाव तलाठी लखन खटाणे आणि सर्व कोतवाल आणि खरडा इंग्लिश स्कूल खर्डाचे प्राचार्य श्री सय्यद सर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये डोमासाईल, जात प्रमाणपत्र, नागरिकत्वाचे विविध पुरावे यासारखे सर्व प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगल शिंगाणे यांनी केले तर प्रस्तावना मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे यांनी मांडली. तर कार्यक्रमाचे आभार उर्मिला कवडे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी ग्रामीण विकास केंद्र सदस्य विशाल पवार, राजू शिंदे ,निता इंगळे,राणी बोत्रे, लखुपती बाई गोलेकर, आश्मा आतार, पांडुरंग शिंगणे इत्यादी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा