खर्डा प्रतिनधी/३ऑगस्ट२०२५
"कर्तृत्व हेच ओळख निर्माण करतं" या उक्तीप्रमाणे नायगाव (ता. जामखेड) येथील सरपंच शिवाजी ससाणे यांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे राज्यभरात नावलौकिक मिळवला असून, त्यांना राज्यस्तरीय ' ग्रामरत्न सरपंच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
दिनांक 29 व 30 जुलै 2025 रोजी लोणावळा येथे ग्रामरत्न सरपंच आयोजित दोन दिवसीय ग्रामीण सशक्तिकरण संमेलनात, शिवाजी ससाणे यांना ग्रामविकास, लोकसहभाग, जलव्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, शिक्षण व स्वच्छता या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले.
खर्डा पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड,शहाजी उगले, धनसिंग साळुंके,-उद्धव सोनवणे, उपस्थित होते
या कार्यक्रमात खर्डा पोलिस स्टेशनच्या वतीनेही सरपंच ससाणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांनी ग्रामीण स्तरावर सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी घेतलेले पुढाकार, तरुणांसाठी दिशा आणि प्रेरणा ठरले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा