नेवासा प्रतिनिधी/3 सप्टेंबर2025
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजेचा वापर केल्यास नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी मंडळांसह डीजे मालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांचा वापर करून उत्सव शांततेत साजरा करावा, अन्यथा नियमभंग करणाऱ्या मंडळांना गुंडगिरीविरोधी कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि लेझर लाईटचा वापर पूर्णपणे बंद असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही मंडळाकडून डीजेचा वापर झाल्यास त्याच्यासह त्या मंडळावरही कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी इशारा दिला. तसेच, शांततेत पारंपारिक वाद्यांचा वापर करून उत्सव विधीने करावा, यासाठी पोलीस प्रशासन लक्ष ठेवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. डीजे आणि लेझर लाईटमुळे होणाऱ्या पारंपरिक उत्सवात त्रास टाळण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी गणेश मंडळांना धार्मिक व सांस्कृतिक उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा