जामखेड तालुक्यातील चोंडी येथे सभापती प्रा. राम शिंदे यांची विविध विकासकामांनिमित्त भेट सामाजिक कार्यकर्ते सागर टकले आणि संतोष गव्हाळे यांनी घेतली. दोघेही सभापती राम शिंदे यांचे खंदे समर्थक असून, विकासकामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
सागर भाऊ टकले व संतोष गव्हाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच युवकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहेत. महिलांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांसाठी विविध उपक्रम राबवित त्यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, वार्ड क्रमांक 11 मधून सागर भाऊ टकले हे इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
तर वॉर्ड क्रमांक १२ मधून संतोष गव्हाळे इच्छुक उमेदवार आहेत.स्थानिक पातळीवर त्यांची पकड मजबूत असून, नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यांना मिळत आहे.शहरातील युवकवर्ग व नागरिकांमध्ये “सागर भाऊ” यांच्याबद्दल मोठी क्रेझ असून—जनतेचा आग्रह आहे की, “सेवाभावी आणि सक्रिय नेता नगरसेवक म्हणून हवा तर सागर भाऊच!”
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा