खर्डा प्रतिनिधी / १५ ऑक्टोबर
खर्डा पोलीस स्टेशन हद्दीत एक लहान मुलगा सापडला असून तो स्वतःचे नाव आणि गाव सांगू शकत नाही. सदर मुलगा सध्या खर्डा पोलिसांच्या संरक्षणात आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या मुलाची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे.या मुलाबद्दल कोनाला माहिती असल्यास त्यांनी तातडीने खर्डा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे पोलिसांकडून कळविण्यात आले आहे. पोलिसांकडून मुलाची ओळख पटविण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी संबंधित माहिती देऊन मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा