जामखेड प्रतिनिधी /१२ऑक्टोबर२०२५
जामखेड शहरात उघडपणे चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेले तब्बल तीन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी (दि. 10 ऑक्टोबर) दुपारी घडली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.फिर्यादी अभय अशोक शिंगवी (वय 47) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शुक्रवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया, जामखेड येथून चेकद्वारे साडेतीन लाख रुपये काढले. त्यापैकी पन्नास हजार रुपये खिशात ठेवून तीन लाख रुपये त्यांनी आपल्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवले.यानंतर शिंगवी हे आपल्या जयहिंद चौकातील चष्म्याच्या दुकानात गेले. ग्राहक असल्याने त्यांनी स्कूटी दुकानासमोर पार्क करून थोडावेळ दुकानात वेळ घालवला. गिर्हाईक झाल्यावर ते बीड रोडवरील नगर मर्चंट बँकेत पैसे भरण्यासाठी गेले. मात्र, डिक्की उघडून पाहता तीन लाख रुपये त्यात आढळले नाहीत. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली.शिंगवी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा