खर्डा प्रतिनिधी : २८ ऑगस्ट
मागील अडिच वर्षाच्या काळात जनता, कार्यकर्ते व अधिकारी यांचेवर इतका दबाव वाढला होता की, आपण लोकशाहीत जगत आहोत की निजामाच्या हुकुमशाहीत हेच समजत नव्हते. या वर्षांत स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण झाली म्हणून आपण ७५ वा अमृतमहोत्सव देशभर साजरा करत असताना कर्जत जामखेडमध्ये पुन्हा निजामशाही आलीय की काय असा भास होत होता. आ. रोहित पवार यांचे नाव न घेता त्यांचेवर अशी परखड टीका करतानाच २००९ च्या तुलनेत २०१४ साली पराभव होऊनही तुम्ही दिलेल्या १० हजार वाढीव मतांचे मुल्यमापन करत पक्षाने मला अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याची अगोदर आमदार म्हणून तुमच्यात पाठवले आहे. तसेच सरकारही आपलेच आले आहे. त्यामुळे आता तुमचा सासुरवास संपला आहे असे प्रतिपादन आ. प्रा.राम शिंदे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध तरूण मंडळे व खर्डा ग्रामपंचायतच्यावतीने आ. प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर निवडून गेल्याबद्दल भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते.यावेळी पत्रकारांच्या वतीनेही आ. प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी सत्कारस उत्तर देताना आ. शिंदे बोलत होते. यावेळी खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. नमिता गोपाळघरे, भाजपाचे कर्जत-जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिंवसरा, सोमनाथ पाचरणे, वैजीनाथ पाटील, ग्राम विकास अधिकारी प्रशांत सातपुते, सोपान गोपळघरे, महेश दिंडोरे, नंदू गोलेकर, मदन पाटील,बाळासाहेब गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, टिल्लू पंजाबी ,गणेश शिंदे,उद्धव हुलगुंडे, पप्पू दिंडोरे, राजू मोरे, रोहित भंडारी, धनसिंग साळुंखे ,दत्ता चिंचकर, अशोक गीते, पत्रकार दत्तराज पवार, पोलीस वारंट संपादिका श्वेता गायकवाड, संतोष थोरात, आशुतोष गायकवाड, सत्तार शेख, अनिल धोत्रे, किशोर दुशी, सह विविध मान्यवर, कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. प्रा. राम शिंदे म्हणाले की,
स्वातंत्र मिळालेनंतर माझ्या माध्यमातून कर्जत जामखेड मतदारसंघाला पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. ते मिळाले नंतर जो विकास महाराष्ट्राच्या इतर भागात झाला होता तसाच विकास कर्जत जामखेडमध्ये करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यानुसार महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जलसंधारण मंत्री झाल्यावर खर्डा परिसरातील नदी, ओढे अशा ठिकाणी बंधारे बांधायला जागा राहीली नाही. ईतक्या मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे मागील ४-५ वर्षांच्या काळात एकही टॅंकर लावावा लागला नाही. खर्डा गटातील अनेक गावे व खर्डा परिसरातील सर्व वाड्यांपर्यंत डांबरीकरण रस्ते करण्याचा प्रयत्न केला. तसेच आपण सर्व खर्डा येथील कार्यकर्ते व ग्रामपंचायतच्या मागणीनुसार तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून खर्डा शहरासाठी तब्बल ६ कोटी रूपयांच्या खर्डा आरोग्य केंद्राच्या इमरत बांधकामास मान्यता घेतली होती. ते कामही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. त्याचेही लवकरच उद्घाटन करण्यात येईल माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी १९९९ साली भुमीपुजन केलेल्या अमृतलिंक तलावाचे काम २०१४ साली म्हणजे १५ वर्षांनी पुर्ण केले. तोही यावर्षी सलग तिसऱ्यांदा पुर्ण भरेल अशी परिस्थिती आहे. अशा प्रकारे विकासाचा मोठा दृष्टीकोन ठेवून शेतकऱ्यांना काय लागतंय, कशाची अडचण आहे. हे पाहुन विकासाचे काम झाले पाहिजे. आमदार तर आमदार तर झालोच आहे. सरकारही आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातही मोठा विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच खर्डा येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत खर्डा शहराचे नामकरण शिवपट्टन करण्याचा ठराव झाला आहे. तोही लवकरच मंजूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकशाही मधलं आपलं सरकार, आपला माणूस आपला लोकप्रतिनिधी ही भुमिका घेऊन तसेच सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून गेल्या १० वर्षांच्या कालखंडात काम केले. त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. लोकांच्या मनात असलेली भावना व विश्वास खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काम केल्याची पावती या अडिच महिन्यांच्या कालावधीत मला पाहायला मिळाली. असेही आश्वासन आ. प्रा. राम शिंदे यांनी आपल्या सत्कारास उत्तर देताना केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा