जामखेड प्रतिनिधी: २९ आगस्ट
कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील पाणंद रस्त्यांच्या कामात अपहार झाल्याचा आरोप भाजपचे विधानपरिषदेतील आमदार राम शिंदे यांनी केला होता.त्यानुसार राज्य सरकारने या कामावर चौकशी समिती नेमली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. मतदारसंघात झालेल्या रस्त्यांवरून केवळ धुरळा उडवण्याचे काम विरोधकांकडून होत असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
आमदार पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्त्यांसाठी निधी आणला आणि सरकारचा पैसा जपून वापरताना मुरमीकरण व माती कामातूनही रस्त्यांची गुणवत्ता राखता येते, हे दाखवून दिले. त्यामुळे नेहमीप्रमाणे लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे उद्योग विरोधकांकडून केले जात आहे. मतदारसंघात मागील अडीच वर्षांत दीड हजार किलोमीटर पेक्षा अधिक लांबीचे केवळ पाणंद रस्ते तयार झाले असून, याचा एक लाख 80 हजार पेक्षाही अधिक लोकांना फायदा झाल्याचा दावा त्यांनी केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा