खर्डा प्रतिनिधी : ३० आॅगस्ट
खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूल विद्यालय येथे कला विभागाच्या वतीने पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत इयत्ता पाचवी ते आठवीतील १६४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या पर्यावरण पूरक व मूर्तींचे महत्त्व व पर्यावरणनाचा समतोल राखण्यासाठी शाडू मातीच्या मूर्ती किती आवश्यक आहेत पटवून दिले. तसेच इको फ्रेंन्डली श्री गणेश मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांना करून दाखवले. कला शिक्षक प्रा. शरद शिरसाट यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने विविधरंगी श्री गणेश मूर्ती साकार केल्या.
कार्यशाळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ उगले, उपमुख्याध्यापिका राजेश्री दुधाळ, पर्यवेक्षक रमेश पाटील, कलाशिक्षक प्रा. शरद शिरसाट, प्रा. विकास जाधव, प्रा रविंद्र कोरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा