जामखेड प्रतिनिधी : २४ आॅगस्ट
दोन महीन्यापुर्वी पुणे येथे मोलमजुरी करून पोटभरण्यासाठी गेलेल्या जामखेड नागेश रामदास पवार या तरुणास
रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक अटक करून मारहाण झालेल्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी व मयत नागेशच्या कुटुंबास योग्य ती मदत करावी. अशी मागणी आ. रोहित पवार यांनी विधान सभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समोर मांडली.
याबाबत बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, चोरी ही चोरी असते. मात्र एखाद्या छोट्याशा चोरीच्या गुन्ह्यात एखाद्याला मृत्यू येईपर्यंत मारणे योग्य नाही. यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे काम असर्थनिय आहे. त्यामुळे पुणे रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू पावलेल्या जामखेड येथिल नागेश पवार याच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करले का? तसेच त्याचे कुटुंबाला सरकार अर्थिक मदत करेल काय? असे प्रश्न उपस्थित करत अधिवेशन संपण्यापूर्वी सरकार या मागण्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली.
तर माजी माजीमंत्री आ. धनंजय मुंडे यांनीही आ. रोहित पवार यांच्या मागणीचे समर्थन करत अधिवेशनाचे आजच्या दिवसाचे कामकाज संपेपर्यंत आ. रोहित पवार यांच्या मागणीची दखल घ्यावी अशी मागणी केली.
तर विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सरकारने या मागणीची दखल घ्यावी असा आदेश दिला आहे.
No comments:
Post a Comment