रासायनिक खते निर्मिती कंपन्यांकडून लिंकिंग मटेरियल देते
हे धोरण योग्य नसल्याने त्या विरोधात शुक्रवार दि.२६ ऑगस्ट २०२२ रोजी जामखेड तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
कृषिप्रधान देश म्हणून भारताची
जगभरात ख्याती आहे. या कृषीप्रधान देशांमध्ये शेतकरी व शेतीशी संलग्न असणारा लघुउद्योजक सुखी आणि समाधानी झाला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य सरकारे सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. शेतीसाठी लागणारे बी बियाणे रासायनिक खते आणि कीटकनाशके विक्री करणारे कृषी सेवा केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. परंतु सध्या रासायनिक खत उत्पादक कंपन्याकडून कृषी सेवा केंद्र चालक व शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. शेतामधून अधिकाधिक उत्पन्न यावे याकरिता रासायनिक खतांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु रासायनिक खताच्या प्रचंड वाढलेल्या किमती व त्यासोबत कंपन्यांकडून दिले जाणारे लिंकिंग मटेरियल यामुळे कृषी सेवा केंद्र चालक पूर्णपणे हतबल झाला असून कृषी सेवा केंद्र चालू ठेवावे की बंद करावे. अशा मनस्थितीत केंद्रचालक अडकल्याचे दिसून येत आहे. मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होत असलेले युरिया, डीएपी,१०:२६:२६,१५:१५:१५ या खतांसोबत रासायनिक खत उत्पादक कंपन्या भरमसाठ इतर लिंकिंग मटेरियल देत आहेत. शेतकऱ्यांना गरज नसते त्यावेळी शेतकरी फक्त रासायनिक खतेच मागतो. पर्यायाने कंपनीने दिलेले लिंकिंग मटेरियल कृषी सेवक केंद्र चालकाच्या माथी पडते. तसेच बऱ्याच रासायनिक खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या युरिया सारखे खत पोहच देण्याऐवजी वारे माप भाडे आकारतात. यामुळे युरिया खताची गोणी एमआरपी पेक्षा २० ते २५ रुपये जास्त किमतीने येऊन पडते. अशा परिस्थितीमध्ये सदर भाडे दुकानदाराच्या माथी पडते. याच गोष्टीला कंटाळून अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील कृषी सेवा केंद्र बंद ठेवून कंपन्यांचा निषेध नोंदवत आहेत.
यामुळे उद्या शुक्रवार दि. २६ऑगस्ट रोजी जामखेड तालुका सीड्स पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स डीलर्स असोसिएशन जामखेडच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय तालुका संघटनेने घेतलेला आहे. तसेच या बंद बाबत महाराष्ट्र राज्य कृषी संचालक, जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी अहमदनगर, कृषी विकास अधिकारी जि. प. अहमदनगर, तालुका कृषी अधिकारी जामखेड, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती जामखेड, यांना निवेदने दिली असून या बंदमध्ये जामखेड तालुक्यातील सर्व कृषी सेवा धारकांनी सहभागी व्हावे व आपले दुकाने एक दिवसासाठी बंद ठेवावीत असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. या संदर्भात निवेदनात देताना वजामखेड तालुका सीड्स पेस्टिसाइट्स अँड फर्टीलायझर असोसिएशनचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष सुनील चोरडिया, सचिव शंतनू राजे निंबाळकर सह तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment