खर्डा प्रतिनिधी : २३ आॅगस्ट
येथिल पत्रकार म्हणून तुम्ही खर्डा गावाचा पहिल्यांदा विचार करता मग स्वतःचा, खर्डा परिसरात पर्यटन क्षेत्र खूप मोठे आहे. ईथे परिसर पाहण्यासाठी व देव दर्शनासाठी येऊ शकतात असे झाले तर येथिल अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होऊ शकतो. जगातला सर्वात उंच भगवा ध्वज फडकवला, तो त्याग व बलीदानाच प्रतिक आहे. आणि तो आपल्या भूमीत असवं या हेतूने आपण ते केले. पण सर्व राज्य, देश व जगाला कळावे म्हणून आपण हे केले. असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.
खर्डा येथील दत्तराज पवार या वृत्तपत्र प्रतिनिधी कार्यालयाचे उद्घाटन आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी पं. स. सदस्य विजयसिंह गोलेकर,चंद्रकांत गोलेकर ,प्रकाश गोलेकर, माजी सरपंच शिवकुमार गुळवे, पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता गायकवाड, पत्रकार संतोष थोरात, बाळासाहेब शिंदे, किशोर दुशी, नंदूसिंग परदेशी, आशुतोष गायकवाड, कार्यकर्ते कपिल लोंढे,शामभाऊ सकट, संदीप बिरंगळ, दादाभाऊ चौरे, मोहन भोसले, आदी मान्यवर अधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रस्ताविक व आभार पत्रकार दत्तराज पवार यांनी मानले.
यावेळी त्यांनी खर्डा परिसरातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. जामखेडच्या पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावला तसेच जर ग्रामपंचायतने जागा दिली तर खर्डा येथील पत्रकारासाठीही पत्रकार भवन करण्याचे आश्वासनही आ. रोहित पवार यांनी दिले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन, प्रस्ताविक व आभार दत्तराज पवार यांनी केले.
No comments:
Post a Comment