जामखेड येथे आ. रोहित पवार यांच्या वतीने आयोजित दहीहंडी स्पर्धेत सात थरांच्या चित्तथरारक थरानंतर शिवप्रेरणा सुपर दर्या पथकाने फोडली दहीहंडी, व दहीहंडी स्पर्धेचे १०११११ रूपयांचे जिंकले प्रथम बक्षीस तर सहभागाबद्दल संकल्प प्रतिष्ठान इंदापूर, जय मल्हार पथक बारामती व शंभूराज संकूल जामखेड या पथकांचा आ. रोहित पवार व सिने अभिनेत्री जय मल्हार मालिकेतील बानू फेम इशा केसकर यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, आपल्याला कर्जत जामखेडची ओळख महाराष्ट्रला करून द्यायची आहे. यासाठीच मागील वर्षी खर्डा येथे देशातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वज, १५ आॅगस्टला जामखेड येथे भव्य १०० फुट तिरंगा ध्वज उभारला तर आज पहिल्यांदाच मुंबई पुण्यासारखा भव्य दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला आहे. आपण सर्वांनी मिळून केलेल्या नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. या कार्यक्रमांसाठी सर्व समाजाचे लोक एकत्र आले ही आपली ऐकीची ताकद कोणी कितीही कितीही प्रयत्न केले तरी तोडू शकत नाहीत. असेही प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले,कर्जत-जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून काल दि. २२ आॅगस्ट रोजी जामखेड येथिल श्री. नागेश विद्यालय येथे भव्य दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी आ. रोहित पवार व सिने अभिनेत्री जय मल्हार मालिकेतील बानू फेम इशा केसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, जेष्ठ नेते सुरेश भोसले, वैजीनाथ पोले, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, माजी नगर सेवक मोहन पवार, प्रा. राहुल अहिरे, विजयसिंह गोलेकर, हरिभाऊ आजबे, संजय वराट, प्रकाश सदाफुले, प्रविण उगले, रमेश आजबे, राजेंद्र पवार, राहुल उगले, जुबेर शेख, आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक महिला, तरूण व लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, आपण कुटुंब म्हणून एकत्र काम करत असताना जामखेड तालुका व शहरासाठी अनेक विकास कामे केली आहेत. यामध्ये जामखेड शहरासाठी १६० कोटींची नवीन नवीन पाणी पुरवठा योजना, ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून भव्य असे उपजिल्हा रुग्णालयात रूग्णालय दर्जाचे हाॅस्पिटल, पंचायत समिती कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याचे विस्तारीकरण, कर्मचारी निवासस्थान, पोलिस वसाहत, ठिक ठिकाणी तलाठी कार्यालये, जामखेड शहरासाठी नगरपरिषदेसाठी नवीन इमारत, दोन श्री. नागेश्वर पालखी मार्ग, विचारणा नदी किनारी भव्य शंकर मुर्ती, सुशोभीकरण, संविधान स्तंभ, नानानानी पार्क अशी अनेक कामे करण्यात आली असून लवकरच कर्जत येथे महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात येणार आहे. या सर्व झालेल्या व होत असलेल्या विकास कामांच्या जोरदार महाराष्ट्रत कुठेही गेले तरी कर्जत जामखेडची ओळख वेगळ्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी तुम्ही मला नेहमीच ताकद द्याल अशी अपेक्षा ठेवतो. तसेच या पवित्र भुमीचा अभिमान शेवटपर्यंत कायम ठेवण्याची आपण शपथ घेऊया असे आवाहनही आ. रोहित पवार यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्जत येथील प्रसिद्ध निवेदक निलेश दिवटे यांनी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment