जामखेड प्रतिनिधी : १५ सप्टेंबर
जामखेड तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या 8590 लाभार्थ्यांची इ-केवायसी अजूनही प्रलंबित असून आहे. यापैकी ग्रामसेवकांनी दिलेल्या 30 गावातील 2965 नागरिकांची इ-केवायसी प्रलंबित आहे. याबाबत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी इ-केवायसी प्रलंबित खातेदारांची यादीच प्रसिद्ध केली आहे.
या यादीतील सर्व नागरिकांना सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, केंद्र चालक, रोजगार सेवक यांनी माहिती देऊन तात्काळ इ-केवायसी करून घ्यावी. त्यासाठी ग्रामपंचायत कॅम्प आयोजित करावे. सदर यादीचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार करावा. जर इ-केवायसी झाली नाही तर 6000 रु इथून पुढे मिळणार नाहीत व आपले नाव योजनेतून कायमस्वरूपी वगळले जाईल याची नोंद घ्यावी. असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment